राजकारणातील घराणेशाहीचा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका: पंतप्रधान मोदी

7
0
Share:

राजकारणातील घराणेशाही हा आपल्या देशातील लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे आपण राजकीय घराणेशाही समूळ उखडून फेकायला हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राजकीय घराणेशाहीत कधीही राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिले जात नाही. कारण त्याठिकाणी मी आणि माझे कुटुंब एवढाच विचार केला जातो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
आपल्याकडे राजकारणात तरुण लोकांनी यायची गरज आहे. राजकारण समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तरुणांनी राजकारणात प्रवेश केल्याशिवाय लोकशाहीला कमजोर करणाऱ्या घराणेशाहीच्या विषाचा प्रभाव कमी होणार नाही, असेही मोदी यांनी म्हटले.
ते मंगळवारी राष्ट्रीय युवा संसदेच्या सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. सध्याच्या काळात नागरिक प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देत आहेत. परंतु, अजूनही देशातील राजकीय घराणेशाहीचा रोग पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारतीय राजकारणात अजूनही काहीजण स्वत:च्या परिवाराचा विचार करतात’ भारतीय राजकारणात अजूनही काही लोकांच्या राजकारणाच केंद्रबिंदू हा त्यांचे कुटुंबच हा आहे. परिवाराच्या नावावर निवडणुका जिंकणाऱ्याची संख्या अलीकडच्या काळात कमी झाली आहे. मात्र, अजूनही घराणेशाहीचा रोग पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. घराणेशाहीचे पाईक असणाऱ्यांसाठी कधीही राष्ट्र हे प्रथम नसते. हे लोक स्वत:च्या कुटुंबाचे हित प्रथम पाहतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Share: