मुंबई APMC मार्केटवर मृत्युच सावट… कोटींचा व्यापार पण सवलती मात्र शुन्य

29
0
Share:

-मुंबई APMC मार्केटवर मृत्युच सावट, प्रशासन मात्र थंडच

-कोंटीचा व्यवसाय होतोय  धोक्याच्या छत्रेखाली

-व्यापारी आणि ग्राहकांनमध्ये भीतीच सावट

-कोण रााहणार घडणाऱ्या घटनेला जवाबदार

मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पाच मार्केट आहेत , या पाच मार्केट मध्ये कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट मध्ये प्रत्येकी कांदा बटाटा मार्केट मध्ये – २२५ तर मसाला मार्केट मध्ये २७२ असे एकुण ४९७ गाळे आहेत .  ज्या गाळ्यांध्ये  रोज कोटींचा व्यवहार होतो. पण हे सर्व गाळे अतिशय धोकादायक आहे असे नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अहवालात म्हटले होते. तसेच ह्या सर्व इमारती अतिशय धोकादायक आहेत असे बोर्ड हि लावण्यात आले आहेत. परंतु काही नेते मंडळी कित्येकवेळा ह्या बाजारसमितीला भेट देतात पण तरीसुद्धा ते ह्या सर्व मुद्यांवर लक्ष घालत नाहीत.अतिधोकादाय ठरवलेल्या इमारतीत जर काही अघटीत घटना घडली तर ह्या सर्व घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न ऐरणीवर येतो.तसेच अशीच नेमकी परिस्थिती ही मसाला मार्केटची आहे. मसाला मार्केट मध्ये २७२ गाळे आहेत तसेच चार माळ्यांची बिल्डिंग आहे,  ह्या सर्व इमारती आणि गाळ्यांची परिस्थिती ही सुद्धा अतिशय बिकट आहे ह्या सर्व इमारती केव्हाही कोसळु शकतात असा अहवाल VJTI ने आपल्या २०१७ च्या स्ट्रकचरल आँडीट मध्ये  दिला होता. कांदा- बटाटा आणि मसाला मार्केट ची अवस्था पहायला गेल तर खांबाना गेलेले तडे ढासाळेले स्लॅब, जीर्ण बांधकाम ह्या सर्व प्रश्नांनी व्यापारी त्रस्त आहेत. ३५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मार्केटची इमारत प्रशासनाकडुन अतिधोकादायक घोषित करण्यात आली आहे.


तसेच मार्केटचा वापर थांबवून ते तात्काळ खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर व्यापारी असे म्हणत आहेेत की आम्हांला तात्तपुरते दुसरे मार्केट उभारुन द्यावे तरच आम्ही हे मार्केट खाली करु असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. तसेच यावर बाजार समितीचे असे म्हणने आहे की पुनर्वसन करायचे असेल आमच्याकडे पैसे नाही आहे्त, व्यापारींनी पैसे दिले तर आम्ही सर्व गाळे बांधुन देउ असे बाजार समितीचे म्हणने आहे.

ह्या सर्व प्रकरणांवर काही दिवसापुर्वी मार्केट परिसरात येउन पणन मंत्री राम शिंदे यांनी पहाणी केली, आणि सर्व व्यापारी आणि बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी सोबत बैठक घेउन धोकादायक असलेलया आणि मोडकळीस आलेल्या कांदा बटाटा मार्केट आणि इतर मार्केटच पुनर्वसन करु असे अश्वासन दिले.

Share: