शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल; कांद्याची साठवणूक करून दरात वाढ करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून आरोप!

18
0
Share:

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात आज कांदा बटाटा मार्केटमध्ये ११५ गाड्यांची आवक झाली असुन ६४ गाड्या कांदा आल्या आहेत. गेल्या ७ दिवसांपासून कांद्याचे दर गेल्या गगनाला भिडले होते. तसेच कांदा हा ८० ते ९० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता.पुणे जुन्नर येथील उपबाजारात कांदा १२१ रुपये किलो तर लालसळगावमध्ये कांद्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन ७० रुपयांपासून लिलाव सुरू झाला आहे. तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्याच्या दरात ३० रुपयांनी घसरण झाली आहे.

अनधिकृतपणे कांद्याची साठवणूक करून दरवर्षी दसरा-दिवाळीच्यावेळी दरात वाढ करण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून करण्यात येतो. तसेच शेतकऱ्याकडून कमी दरात कांदा विकत घेऊन बाजारात जास्त दरात व्यापारी विकत असतात यामध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा फायदा नसल्याचा आरोप इतर व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हा कंगाल तर व्यापारी हा मालामाल होत आहे.

सध्या मुंबई एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असून  ६० ते ७० रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तसेच नाफेड, इजिप्त, इराण या ठिकाणांहुन आलेल्या कांद्यालादेखील उठाव नसल्याने हा कांदा बाजारात पडून आहे. तसेच इजिप्त आणि इराण मधून एकूण ५० टन कांदा आला असून ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. परंतु बाजारात ग्राहक नसल्याने कांद्याला उठाव नाही.

तर नेमका कांद्याला आज काय भाव आहे हे आपण जाणून घेऊया

नवीन कांदा २० ते ६० रुपये किलो
नाफेडवरून जो कांदा आला आहे तो २५ ते ५० रुपये किलो
इराण व इजिप्तवरून जो कांदा आला आहे तो ५५ ते ६० रुपये किलो, मध्यप्रदेशमधून जो कांदा आला आहे तो ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे.

Share: