लाचारांनी स्वाभिमान शिकवू नये : शशिकांत शिंदे

23
0
Share:

सातारा:कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षबदल करणाऱ्या लाचार माणसाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्वाभिमान शिकवू नये. यंदा राष्ट्रवादी जोरदारपणे उसळी घेणार आहे. राज्यासह कोरेगावमध्ये असेच चित्र आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

येथील शिवसेना उमेदवार महेश शिंदे यांनी स्वाभिमानाची भाषा करीत टीका केली होती. त्यावर पुसेगाव येथील सभेत उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, स्वार्थासाठी ते पक्ष बदलतात. आताही ते शिवसेनेत आणि कार्यकर्ते जुन्याच भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांचे विचार व कार्यकर्त्यांच्या जीवावर खंबीरपणे उभी आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, मागील दोनवेळा माझ्या विरोधात लढणारे आता कुठे आहेत, हे जनतेला माहित आहे.

निवडणुका आल्या की फ़क़्त विरोध करायलाच ते पुढे येतात. जनतेची कामे करण्यासाठी मी व आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चोवीस तास उपलब्ध असतो. दलबदलू उमेदवारांना कोरेगावची जनता स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share: