केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्या विरोधात शेतक-यांच्या  देशव्यापी संपात पाठींबा देण्यासाठी राज्यातील प्रमुख एपीएमसी मार्केट 8 डिसेंबर रोजी राहणार बंद! 

27
0
Share:
नवी मुंबई– केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्या विरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार (08 डिसेंबर) रोजी संप करण्यात निर्णय घेण्यात आला आहे,  शेतक-यांच्या  देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे,या बैठकीत माथाडी नेता नरेंद्र पाटील,आमदार शशिकांत शिंदे,व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व  बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.
केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतक-यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे. केंद्र सरकारच्या कामगार,व्यापारी  व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी मंगळवार ( 8 डिसेंबर) रोजी संपावर जाणार असल्याचे व शेतक-यांच्या देशव्यापी संपात सामील होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस  नरेंद्र पाटील,आमदार शशिकांत शिंदे,कार्याध्यक्ष  गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी घेतले यामध्ये आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य,मसाला,फळ,भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट बंद राहणार असून राज्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक,पुणे बाजारपेठ बंद  राहणार अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी वर्ग व्यापार करतात,माथाडी कामगार कष्टांची कामे करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषि व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापा- यांचा व्यापार  आणि कष्टांची कामे करणा-या माथाडी कामगारांची कामे कमी झाली आहेत,शेतकरी वर्गाचे देखील या कायद्यामुळे नुकसान होत आहे,या घटकांवर बेकारीचे संकट ओढविण्याची भिती निर्माण झालेली आहे.कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील घटकांचा केंद्र सरकारने विचार करावा व या घटकांचे नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापारी,माथाडी कामगार,शेतकरी व अन्य घटकांनी दि.8 डिसेंबर रोजीच्या  देशव्यापी संपात सहभागी व्हावे,असे आवाहन माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र   पाटील  यांनी केले आहे.
Share: