पुलावामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई, पनवेल मधील धगधगता आक्रोश

23
0
Share:

नवी मुंबई: काल पुलवामा इथे दहशतवादी हल्ला झाला त्यात भारताचे सीआरपीएफ चे ३९ जवान शाहिद झाले या हीन कृत्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी लोक एकत्र येउन रस्त्यावर उतरून सामान्य लोक पाकिस्तान विरुद्ध व दहशतवादी संघटनेविरुद्ध राग व्यक्त करत आहे.
नवी मुंबई आणि पनवेल इथली जनता देखील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून शोक यात्रा आणि शोक सभांच आयोजन केल होते आणि पाकिस्तानचा झेंडा व पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या पुतळ्याला चप्पल फेकून मारले.
वाशी एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा शोकसभेच आयोजन करण्यात आलं होते वाशी मार्केटच्या पाचही मार्केटमध्ये शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली गेली मार्केटच्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर ३ वाजता शोकसभेच आयोजन करण्यात आले या सभेत ५०० ते ६०० अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुबंईच्या विविध शाळांत आणि कॉलेज मध्ये शोकसभेच आयोजन करण्यात आले होते आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला असं वाटत आहे की आपल्या अंगावर घाव झाला आहे याचा बदला जरूर घेतला पाहिजे.

Share: