देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केलेल्या महामंडळवर ठाकरे सरकार लवकर मोठा निर्णय करणार

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून एकामागून एक निर्णयांचा धडाकाच लावला आहे . आता त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळे आणि मंडळांकडे वळवला आहे. यातील काही महामंडळांच्या अध्यक्षाला तर राज्यमंत्रिपदाचा दर्जाही आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे .तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकार स्थापनेनंतर सर्व महामंडळांवर आपल्या मर्जीतील नेमणुकांचा सपाटा लावला होता. आता सत्तांतरानंतर महाविकासआघाडीने देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भाजपच्या नियुक्या रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठकही झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील महामंडळांवर नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं राजकीय पुनर्वसन होत आलेलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपच्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाही निर्णय घेऊन तसे आदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी महामंडळांच्या नियुक्ती पुन्हा करणार असल्याचं मत आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असलेली महामंडळे
- महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
- महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
- महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
- महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
- महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या.
- हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
- तापी पाटबंधारे विकास महामंडळ
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
- इतर मागासवर्ग विकास महामंडळ
- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र वखार महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
- महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन 2010
मंडळे
- महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ