तोतया नेव्ही अधिकारी अटकेत

नवी मुंबई: नेव्ही कॅन्टीनमधून  फोन,लँपटॉप,सोने व इतर साहित्य अर्ध्या किमतीत मिळवून  देण्याच्या भूलथापा देऊन लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका भामट्यास वाशी पोलिसांनी अटक केली आहे. मनीष अरिसेला (25) असे त्याचे नाव असून, इंडियन नेव्हीचा अधिकारी असल्याचा गणवेश घालून,नेव्ही कॅन्टीनमधून  फोन,लँपटॉप,सोने व इतर साहित्य अर्ध्या किमतीत मिळवून देतो.असे सांगून त्याच्याकडून रोख रुपये 7,32,700/- रुपये घेतले.पण सांगितल्याप्रमाणे सामान दिले नाही,म्हणून फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता त्यांना पैसे परत न करता मोबाईल बंद करून फरार झाला,म्हणून फिर्याद यांनी वाशी पोलीस ठाणे येथे तक्रार केली.

पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह,पोलीस सह आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी काही एक पथक बनवले होते या पथकाला माहिती मिळाली की आरोपी मनीष अरिसेला हा मेट्रो सिनेमा,मुंबई येथे आहे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने या गुन्ह्याची स्वखुशीने कबुली दिली.झडती केली असता त्याच्या खिशात CAPTAIN 6216541 हे त्याच्या नावाचे व इंडियन नेव्हीचे बनावट ओळखपत्र मिळाले.सदर आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना नेव्ही कॅन्टीन प्रवेशासंदर्भात दिलेली कागदपत्रे देखील बनावट असल्याचे समोर आलेत.सदर आरोपीने अशाच प्रकारे अनेक गरजू लोकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून फिर्यादी व इतर साक्षीदार यांची मिळून आतापर्यत आरोपीने एकूण 16 लाख रुपयापर्यत रकमेची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहेत.जर पुन्हा असा गुन्हा आढल्यास लगेचच वाशी पोलीस ठाणे येथे स्वतः येऊन किंवा दूरध्वनी क्रमांक 02227820346 वर संपर्क साधावा.

You may have missed