मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये भर पावसात 3 ठिकाणी अनधिकृत बांधकाम!

6
0
Share:

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून,ठिकठिकाणी पाणी साचले आहे.बेलापूर,नेरुळ,ऐरोली,वाशी तसेच मुंबई एपीएमसीमधील कांदा बटाटा,फळ,धान्य,भाजीपाला व मसाला मार्केट देखील पाण्याखाली गेले आहेत.दुसरीकडे पाहायला गेले की,या भर पावसात मसाला मार्केटमध्ये मार्केट अभियंताच्या आशीर्वादाने गळ्यावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे.मसाला मार्केटमध्ये 3 फीट पाणी साचल्याने धक्यावर काम करणारे व्यापारी ,माथाडी कामगार आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तर दुसरीकडे कार्यकारी अभियंता व मार्केट अभियंताच्या आशीर्वादाने 3 गाळ्यावर अनधिकृत बांधकाम केला जात आहे.


तुम्ही पाहू शकता की, खाली लाकडाचा बांबू बांधून कशा पध्दतीने बांधकाम केल जात आहे,पूर्ण मार्केट परिसरात पाण्याखाली गेला असताना भर पावसात बांधकाम केल जात आहे,मसाला मार्केटच्या प्रत्येक विंग मध्ये छतावरून पाणी लिकेज होत असल्याने मार्केटच्या स्थिती दयनीय आहेत,तसेच सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंड अतिधोकादायकचा फलक लावण्यात आला आहे तरी देखील मार्केट अभियंता बिनधास्तपणे गल्यावर बांधकाम करायला साठी परवानगी देत आहेत .

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे,मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये गाळ्यावर बांधकाम करण्यासाठी कार्यकारी अभियंता व मार्केट अभियंता प्रत्येकी 2 लाख रुपये दियाला लागते .मार्केटमध्ये पाणी साचल्याने पूर्ण व्यापार विस्कळीत झाला आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी उपायोजना सोडून अभियंता अनधिकृत बांधकामासाठी व्यापाऱ्यला परवानगी देत आहेत.पाण्याचा निचरा होत नाही, थोडा पाऊस पडल्यावर मार्केट पाण्याखाली जातो,भिवंडीमध्ये एका इमारती कोसळून 35 जणांची मृत्यू झाली आहे तर मसाला मार्केटमध्ये अति धोकादायक इमारत कोसळले तर यांच्या जबाबदारी कार्यकारी अभियंता राहील का ?असा प्रश्न व्यापारी करत आहेत,आणि भर पावसात धोकादायक असलेल्या गाळ्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या कार्यकारी अभियंता व मार्केट अभियंतावर कारवाई होणार का असे चर्चा बाजार आवरत होत आहे.

Share: