मुंबई APMC मसाला मार्केट मधील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय

6
0
Share:

नवी मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात पडला आहे. (Unauthorized construction in Mumbai APMC Masala Market) नियम धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांनी गळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे. प्रशासनानेच अभय दिल्यामुळे मार्केट अभियंताने कोरोना काळात मार्केटमध्ये अनेक बांधकामसाठी बेकायदेशीरपणे परवानगी दिले. (Unauthorized construction in Mumbai APMC Masala Market)

एकीकडे जर आपण बघितलं तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका व एपीमसी प्रशासनतर्फे बाजार आवारात अँटिझन टेस्ट जोरात सुरू आहे. यामध्ये एपीमसी कर्मचारी, सुरक्षाकर्मी आणि व्यापारी कामाला लागले आहेत तर मार्केट अभियंताच्या कार्यलाय पासून 100 फुटवर अनधिकृत बांधकाम सुरू आहे .मार्केट अभियंताच्या सूट दिल्याने भर पावसात पोटमाळा आणि वाढीव बांधकामत व्यापारी व्यस्त आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका पोटमाळ्यासाठी व्यापाऱ्यांनकडून 2 लाख रुपये तर वाढीव चटई क्षेत्रासाठी 5 लाख रुपये मार्केट अभियंत्यांना द्यावे लागत आहेत. 2016 मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 34 गाळे सील केले होते. यानंतर अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
एपीएमसी मसाला मार्केट मधील J विंग मध्ये गळ्यावर 2 मजली अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. यामध्ये महत्वाची बाब अशी की, अनधिकृत बांधकाम ज्या गळ्यावर होत आहे तिथून 100 फुटावर मार्केट अभियंताच्या कार्यलय आहे . मार्केटच्या उपअभियंता पि.के.पिंगळे यांच्याकडे याबाबत विचारपूस केली असता. अभियंता यांनी सांगितले की,रिपेरिंग चे काम चालू आहे. पण इथे प्रत्यक्षात बांधकाम चालू आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली गेली नाही प्रशासन तर्फे या अभियंतावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही जर भर पावसात अनधिकृत बांधकाममुळे काही घटना घडली त्याचा जबाबदार कोण अशी चर्चा बाजारात सुरू आहे.
मार्केटच्या सर्व गेटवर सुरक्षारक्षक असताना बांधकामाचे साहित्य मार्केटमध्ये येऊच शकत नाही. अधिकारी व कर्मचारी यांच्या संमतीने व्यापाऱ्यांना बांधकाम करण्यास परवानगी दिली.

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली गेली नाही. मार्केटच्या उपअभियंता यांनी भर पावसात गाळ्यावर पावसात बांधकामासाठी परवानगी का दिली, तसेच या बांधकामामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका याकडे पुर्णपणे जाणीवपूर्व दुर्लक्ष करत आहे. एपीएमसी मार्केटमधील बांधकामावर महानगरपालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. प्रशासनाने येथील अनधिकृत बांधकामावर कधीच ठोस भूमिका घेतली नाही. यामूळे अतिक्रमण करण्याचे मनोबल अधिक वाढत असून दिवसेंदिवस अतिक्रमणाची संख्या वाढत आहे.(Unauthorized construction in Mumbai APMC Masala Market)

Share: