मुंबई Apmc भाजीपाला मार्केट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मार्केटमध्ये चालतोय अनधिकृत व्यापार आणि गुटखा व्यवसाय

21
0
Share:

*मुंबई Apmc भाजीपाला मार्केट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मार्केटमध्ये चालतोय अनधिकृत व्यापार आणि गुटखा व्यवसाय

*पॅसेजमध्ये होणाऱ्या अनधिकृत व्यापारावर कोणाचे अभय?

*भाजीपाला मार्केटमध्ये 40 टक्के आवक न मिळाल्याने बाजार फी आणि मापाडी कामगारांचा पगार जवळपास 4 कोटी थकबाकी

*मार्केट निरीक्षकाच्या हलगर्जीपणामुळे मार्केटचा शेष डबघाईला…


नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व नियम शिथिल केल्यामुळे गाड्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्रंदिवस सुरू असणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये मास्कसह सोशल डिस्टनसिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.
भाजीपाला मार्केटमध्ये 3 महिन्यापासून मापाडी कामगारांना पगार न मिळाल्याने आमदार शशिकांत शिंदे यांनी गेटपासून कार्यालायपर्यत मापाडी कामगारांना घेऊन मोर्चा काढला होता.
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे बाजार आवारात येणाऱ्या शेतमाल मध्ये 40 टक्के आवक व्यापाऱ्यांकडून मापाडी कामगारांना मिळत नाही. त्यामुळे मार्केट फी आणि मापाड्याचा पगार मिळून 4 कोटी 24 लाख थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.


भाजीपाला मार्केट रात्री 10 पासून सुरू होते आणि सकाळी 11 पर्यत चालू असते. या मार्केटमध्ये पॅसेजवर सी आणि डी विंग मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे किरकोळ व्यापार होतो. यामध्ये कमीत कमी 30 ते 40 ट्रक धक्यावर लावून पॅसेजमध्ये संपुर्ण भाजीपाला विकून निघून जातात. या अनधिकृत व्यापारामुळे मार्केटच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.


मार्केटमध्ये बाजार फी नाही मापाड्याचा पगार नाही. कोट्यवधी रुपये थकबाकी असूनसुद्धा या अनधिकृत व्यापाऱ्याला अभय कोण देत? तसेच मार्केटच्या पेढ्यावर्ती अनधिकृत चहाचे हॉटेल टाकण्यात आले आहे. बाजार आवारात 10 ते 12 ठिकाणी रात्री 1 पासून सकाळी 8 पर्यत गुटखा, तंबाखू विक्री केले जात असून.बाजार समितीचे अधिकारी सुरक्षारक्षक या गुटखा माफियांना अभय देत आहेत.


नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास एपीएमसी मार्केटमधील गर्दीही कारणीभूत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व गर्दी नियंत्रणात न आल्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार, कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली तर 15 दिवसात बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.


बाजार समितीविषयी नवी मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या. मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांवर निर्बध लावण्यात आले. तसेच मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण, व प्रवेशद्वारावर ऑक्सिजन व तापमान तपासणी व अँटिजेंन टेस्ट देखील सुरू करण्यात आली होती. परंतु, नियममुक्तीमुळे गाड्याची आवक वाढली व नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यास सुरुवात झाली आहे.

पाचही मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. व्यापारी, कामगार तसेच खरेदीदार मस्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये परराज्यातील व रोजनदारीवर काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर यामधील बहुतांश कामगार मार्केटमध्येच वास्तव्य करत असून हे कामगार सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच स्थिती जर राहिली तर नवी मुंबईत कोरोना नियंत्रणा बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share: