श्रमजीवी योजनेसाठी असंघटित कामगारांची नोंदणी

42
0
Share:

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. अत्यल्प मासिक हप्त्यामध्ये साठ वर्षानंतर चांगली पेन्शन मिळवून देणारी ही योजना आहे. ग्रामपंचायतीच्या स्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना व कंत्राटी कर्मचाऱ्यांना यामध्ये सामावून घ्यावे, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्याचे कामगार, शेतमजूर, इत्यादी असंघटित शेतातील कामगार, तसेच शासकीय यंत्रणांच्या सोबत काम करणारे अंगणवाडी सेविका त्यांचे मदतनीस, ग्रामपंचायतकडील कंत्राटी कामगार, महिला बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांचे महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपयेपेक्षा कमी असावे, तसेच त्यांचा वयोगट १८ ते ४० यामध्ये असावा. वयोपरत्वे लाभार्थ्यांना वेगळा हप्ता असून लाभार्थी जितका हप्ता भरणार आहे, तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे.

Share: