काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत 187 हॉटेल्सना फसवणूक करणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी केली अटक.

20
0
Share:

नवी मुंबई:महागडे कपडे घालून हॉटेल्सना लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉनिल झोन असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण 187 हॉटेल्सना लुटलेले आहे.
हॉटेल मध्ये सूट बुक करून आपल्या कंपनीच्या प्रेझेंटेशन दाखवून हॉटेलच्या लैपटॉप आणि इतर महागडी समान घेऊन फसवणूक करणाऱ्या डॉनिल झोन (वय 65) वाशी पोलिसांनी अटक केली आहे .डोनिल आता पर्यंत पूर्ण देशात 187 हॉटेल्स फसवणूक केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.12 डिसेंम्बर रोजी वाशी येथील हॉटेल तुंगा मध्ये डॉनिल झोन यांनी सूट बुक केली व महागडी दारू सुध्दा मागवली आणि त्यांच्याच कंपनीची मीटिंग प्रेझेंटेशन आहे असं दावा करून एक लॅपटॉप घेतला आणि 14 तारखेच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितले त्या वेळेस कोणी आलं नाही या शोधात हॉटेल व्यवस्थापकांनी पडताळणी केली त्या वेळेस डॉनिल झोन ने पलकुटी काढली हे पाहताच वाशी पोलिस ठाण्यात ही घटना दाखल करण्यात आली. वाशी पोलिसांनी काही पुटेजच्या माध्यमातून त्याला ठाणे घोडबंदर मधून ताब्यात घेतल. पोलिसांनी घटनास्थळी पडताळणी केल्यानंतर त्यांना समजल की काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत 187 हॉटेल मध्ये असे प्रकारे फसवणूक केली आहे.पहिल्या हॉटेलमध्ये सूट बुक करायचं आणि महागड्या दारू आणि जेवण करून हॉटेल मधील महागड्या समान घेऊन पसार जायचं काम आता पर्यंत केला आहे . अनेक मालाची त्यानी लुबाडी केली आहे. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे व सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने या 65 वर्षीय नटवर लाल ला अटक केली आहे पोलिसांनी नागरिकांना आव्हान केली आहे की नवी मुंबई ते ठाणे आशा जवळपास अनेक ठिकाणी अशी फसवणूक होऊ शकते तर सर्वांनी सावधान रहा व हॉटेल रूम देताना KYC व पॅनकार्ड ची चौकशी करा असा इशारा वाशी पोलिसांनी दिलाय.

Share: