वाशी NMMC रुग्णालयात व्हेंटिलेटर,डायलिसिस मशीनची तोडफोड,रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा राडा

19
0
Share:

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाची पहाटेच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. तसेच सशस्त्र रुग्णालयात घुसून संतापाच्या भरात तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असून डॉक्टर व नर्सलादेखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे .

वाशी जुहूगाव येथे राहत असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावल्यानेबी त्या रुग्णाला मंगळवारी दुपारच्या सुमारास पालिका रुग्णालयातील नॉनकोव्हिड विभागात दाखल करण्यात आले. यापूर्वी त्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधार नसून ती आणखी खालावत असल्याने त्या रुग्णाला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. ही माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालायावर आक्रमक पद्धतीने सशस्त्र हल्ला केला. तसेच तिथे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाला, डॉक्टरांना, नर्सला मारहाण केली असून रुग्णालयाची तोडफोड देखील केली आहे. तसेच मारहाण करण्यासाठी आलेल्या काहींच्या हातात धारधार शस्त्रदेखील होती असे रुग्णालायतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आयसोलाशन वॉर्डमध्ये घुसून तोडफोड केली असून यात व्हेंटिलेटर , डायलिसीस ची मशीन ,पंखे साहित्य ची नासधूस केली आहे. तसेच सुरक्षा रक्षकास मारहाण करून डॉक्टर आणि नर्सना धक्काबुक्की केली. या तोडफोड व मारहाणीच्या प्रकरणामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणाची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र या सगळ्याचे पडसाद बुधवारी सकाळी उमटले असून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकार सतत घडत असल्याने अशा घटनांचा डॉक्टरांकडून व कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात येत आहे. तसेच या प्रकारामुळे येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची वातावरण असून योग्य सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ,वाशी पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे

Share: