कोरेगाव, खटाव व साताऱ्यातील मतदार राष्ट्रवादीला कौल देणार : शशिकांत शिंदे

18
0
Share:

कोरेगाव, खटाव व साताऱ्यातील मतदार राष्ट्रवादीला कौल देणार : शशिकांत शिंदे

सातारा :राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेमुळे आता या जिल्ह्यातील राजकीय कल स्पष्ट झाला आहे. विकासाला कौल देणारा हा भाग आहे. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी होण्याचा विश्वास वाटतो, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी या भागात दहशतीचा आरोप केलेला होता. मात्र, जनतेच्या कामाला सदैव तत्पर उपलब्ध असल्याने आणि फ़क़्त निवडणुकीच्या काळात जनतेच्या उपयोगी पाडण्यासाठी बाहेर पडणाऱ्या राजकीय मंडळींना कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील जनता स्वीकणार नाही. यंदा पुन्हा एकदा पवार साहेब व मतदारांच्या आशीर्वादावर मोठ्या मताधिक्याने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा विजय नक्की होणार असल्याचा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.

पुसेगाव येथील जाहीर प्रचाराच्या सांगता सभेत शिंदे यांनी हजारो कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त करीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी मतदान घडवून आणण्याचे आवाहन केला.

Share: