नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३५५० रुपये

22
0
Share:

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची २५२ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल २००० ते ३५५० रुपये दर मिळाला. सरासरी दर २५०० रुपये होता. फ्लॉवरला प्रतिक्विंटल १००० ते १८२० रुपये दर मिळाला. सरासरी दर १२५० रुपये राहिला. कोबीची आवक २३४ क्विंटल झाली. कोबीला दर ८३५ ते १६७० रुपये असा दर होता. कोबीला सरासरी दर १२५० रुपये राहिले. ढोबळी मिरचीची आवक ४१ क्विंटल झाली. तिला ३१२५ ते ४८१० रुपये दर असून सरासरी ३७५० दर मिळाला.

भोपळ्याची आवक ३५२ क्विंटल होती. त्यास ६७० ते ३१०० रुपये असा दर होता. सरासरी १७६५ रुपये दर राहिला. दोडक्याची आवक २४ क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ४५८५ रुपये दर होता. सरासरी दर ३९६० रुपये मिळाला. गिलक्याची आवक २० क्विंटल होती.

गिलक्याला २२५० ते २९१५ रुपये दर मिळाला. सरासरी दर २६६५ रुपये होता. बटाट्याची आवक १६३० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १३५० रुपये दर मिळाली. सरासरी दर ९५० रुपये होता. लाल कांद्याची आवक १३०५ क्विंटल झाली. त्यास २५१ ते ९५० रुपये दर मिळाला. सरासरी दर ६५० रुपये होता. कांद्याला सर्वात कमी दर मिळाला. लसणाची आवक २३० क्विंटल होती. दर १३०० ते ४५०० रुपये दरम्यान होता. सरासरी दर प्रतिक्विंटल २७०० रुपये होता.

भेंडीची आवक ८७ क्विंटल होती. दर ३००० ते ४००० रुपये राहिला. सरासरी दर ३७५० रुपये होता. काकडी आवक २३८ क्विंटल होती. काकडीला १७५० ते ३००० रुपये दरम्यान दर मिळाला. सरासरी दर २२५० रुपये होता. काही भाज्यांच्या आवकेमध्ये चढ
उतार झाल्याचे दिसून येते.

Share: