मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये पाणपोईची अवस्था अत्यंत बिकट; माथाडी कामगार तसेच ग्राहकांच्या जीवाशी खेळ

50
0
Share:

नवी मुंबई:  मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये पिण्याचे पाणी अत्यंत दूषित असून. मार्केटमधील पाणपोईच्या अवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत. अनेक माथाडी कामगार व ग्राहक येथून पिण्यासाठी पाणी घेतात.

सध्याच्या या कोरोनाकाळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जबाबदारी घेणं गरचेच आहे. मार्केटमध्ये असलेल्या या दूषित पाणपोईमुळे माथाडी कामगारांना तसेच ग्राहकांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कांदा बटाटा मार्केट आधीच अतिधोकादायक घोषित केले आहे.मार्केट अभियंता म्हणतात पैसे खर्च करण्यासाठी आम्हाला परमिशन नाही मात्र दुसरीकडे पाहल्या तर अभियंता दिवायडर आणि गटार लाईन जवळ पत्रा टाकून लाखो रुपये खर्च केला आहे. मार्केटमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही ,रस्त्या व गटार लाईन पूर्णपणे खराब या विषयावर संचालक गप्प का असा प्रश्न व्यपारी,माथाडी कामगार करत आहे, अनेक कामगार व व्यापारी याठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन व्यापार करत आहेत. आता या दुषीत पाणपोईमुळे जर माथाडी कामगार आजारी पडले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

Share: