मुंबई एपीएमसीच्या अधीक्षक अभियंताचा अजब फतवा,काँक्रिटच्या रस्त्यावर लवकर डांबरीकरण करा !

5
0
Share:

अधीक्षक अभियंता ,मार्केट अभियंता , ग्रोमाचे काही प्रतिनिधी व ठेकेदारांची संगनमताने काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरण करणे व इतर रस्त्याचे बोगस काम सुरू.

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून दाना व मसाला मार्केट बाजारामध्ये काँक्रीटकरण, डांबरीकरण आणि गटाराच्या कामासाठी मंजुरी मिळाली असताना दाना मार्केट येथील व्यापारी भवन आणि जे विभागातील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

या कामाची बाजारसमितीचे अधीक्षक अभियंता व मार्केट अभियंता डोळेझाक करत आहे त्यामुळे रस्त्याची उंची वाढुन कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होतो आहे .टक्केवारी साठी हा अजब कारभार चालू असून या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही व्यापारी करत आहे.कामाच्या दर्जाविषयी ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.काही सामाजिक कार्यकर्ते या कामाच्या कमिशनच्या बाबत व बोगस कामाबाबत सीबीआय कडे तक्रार करणार आहे .

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती येथील दाना मार्केट व मसाला मार्केटमध्ये काँक्रीट,डांबरीकरण व गटाराच्या कामासाठी बाजारसमितीकडून मंजुरी मिळाली आहे.या कामासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.दोन्ही मार्केटच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणा ची कामे बी.जे सिव्हिल वर्क या कंत्राटदाराला देण्यात आली होती.दाना मार्केट व मसाला मार्केट येथे अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे डांबरीकरण केलेले रस्ते लवकर खराब होतात.याशिवाय येथील गटारांची अवस्थाही वाईट आहे म्हणून व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन या कामाची मागणी केली होती.येथील प्रस्तावित ठिकाणी काम केले जात नसून व्यापारी भवन येथील चार वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरच हे डांबरीकरण केले जात असल्याचे जे ब्लॉक मधील काही व्यापाऱ्याने सांगितले.चालू असलेले काम खोदकाम नकरताच डांबरीकरण केले जात आहे.या डांबरीकरणामूळे रस्त्यांची उंची वाढली आहे त्यामुळे माथाडी कामगारांना मालाची चढ-उतार करताना त्रास होत आहे.ड्रेनेजचे काम पाहिजे त्या पद्धतीने केले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या डांबरीकरण चालू असलेल्या डांबराची जाडी देखील कमी आहे.हे काम पूर्ण होण्याचा अवधी पूर्ण होण्यास अवघे तीन महिने बाकी असूनही ३०% कामच झाले आहे त्याच बरोबर इतर सर्व्हिसेस लाईनच्या काम बाकी असताना डांबरीकरण काम सुरू केलेले आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Share: