वाशिखाडी पुलावरून तरुणाने केली आत्महत्या; आत्महतेच्या आधी व्हाट्सएपवरून मित्राला मॅसेज केला.

24
0
Share:

वाशी: वाशी खाडीपुलावरुन संजय पुजारा या व्यक्तीने उडी मारली. संजय पुजारा हा मुंबईतील वांद्रे येथील रहिवाशी असून, रात्री 9 वाजण्याचा सुमारास वाशी खाडी पुलावर येऊन थांबला. स्कूटी पुलावर उभी करुन खाडीत उडी मारली. खाडीत उडी मारण्याआधी संजय पुजाराने मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता.
संजय पुजारा हा व्यक्ती वाशी खाडी पुलाजवळ आला आणि स्कुटी बाजूला लावून त्याने खाडीपुलावरून आत्महत्या केली तो मुंबई मध्ये बांद्रा या परिसरात राहतो. ही घटना जशी स्थानिक मच्छीमाराना कळाली तसे तातडीने सर्व जण शोधमोहिमेत लागले त्यानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मच्छिमारांच्या मदतीने खाडीत शोधमोहिम हाती घेतली. मात्र, समुद्राला भरती असल्याने संजय पुजाराचा शोध काही लागला नाही.
संजय पुजारा याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला व्हाट्सप द्वारे मॅसेज करून कळवला होता अस तपासात पोलिसांना कळाल आहे. वरती खडीपुलावर त्याने स्कुटी आणलेली त्यात त्याचा पाकीट होत त्यामुळे त्याची ओळख पटवणे सोपं झालं.
त्या मॅसेज मध्ये त्याने आपल्या मित्राला सांगितलं की खूप कर्जबाजारी झालो आहे आणि मी सारखा आजारी असतो त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे असं त्या मॅसेज मध्ये लिहलं आहे.

Share: