मुंबई Apmc फ्रूट मार्केट में कुत्ते ने पकड़ा चोर ,देखे Video
मुंबई Apmc फ्रूट मार्केट में कुत्ते ने पकड़ा चोर ,देखे Video
मुंबई apmc फळ मार्केटच्या सुरक्षेसाठी मंडईतील "राजा" आला धावून
मुंबई APMC फळ मार्केट मध्ये राजा नावाचा कुत्रा बनलाय पोलीस. फळ मार्केट मध्ये होणाऱ्या चोऱ्या पकडून देण्याचं काम हा राजा   करत असतो. भाजीपाला मार्केट रात्री २ वाजता सुरु होतो. मार्केट मध्ये शेतमाल आणणाऱ्या गाड्यांचे चालक , क्लिनर आणि व्यापारी मंडळी मध्यरात्रीची झोप घेत असतानाच चोर भाजीपाला मार्केट मधील शौचालयातून फळंमार्केट मध्ये शिरतात आणि चोरी करायची सुरवात करतात. मोबाईल , पैसे आणि महाग फळ घेऊन पळ   काढतात. पण आता हा राजा महिन्यातून १० चोरांना पकडून त्यांना चांगलीच अद्दल घडवत आहे. चोर पकडल्या नंतर त्या बाबत ची माहिती APMC पोलिसांकडे पोहचवली जाते. हा राजा शिकाऊ कुत्र्यासारखा नाही तर हा सामान्य रस्त्यावरील कुत्रा आहे पण फळ मार्केट मध्ये राहून या कुत्र्याने पोलिसांचे रूप धारण केलं आहे. हा राजा रात्रभर फळ मार्केट मधील सुरक्षा रक्षकासोबत पहारा करत असतो आणि चोरांना पकडून देतो. अशीच एक घटना फळ मार्केट मधील व्यापाऱ्यासोबत घडली आहे ३ चोरटयांनी व्यापाऱ्याचे खिसे कापून ३० हजारांची कॅश आणि मोबाईल चोरी करून पळ काढत असता राज्याने पाठलाग करून ३ चोरांमधील एका चोराला पकडून व्यापाराला त्याचे पैसे आणि मोबाईल मिळवून दिला आहे. हि घटना तुम्ही या व्हिडीओ मध्ये पाहू शकता. कश्याप्रकारे हा राजा त्याची कामगिरी बजावत आहे. मात्र ज्या भाजीपाला मार्केट मधून फळ मार्केट मध्ये चोर येऊन चोरी करतात पण राजाच्या चोख कामगिरीत मुळे   हि चोरी पकडली जाते. परंतु मार्केटचे सुरक्षा अधिकारी जाणून बुजून याकडे कानाडोळा करत आहेत, भजीपाला मर्केटमध्ये चोरी ,हत्या ,आणि गुटखा च्या विक्री   उघडपणे होत आहे यांची तक्रार वारंवार व्यापारी   करत आहेत   या सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे मार्केटची स्थित बिकट झाली आहे   सुरक्षा रक्षकांच्या   आशीर्वादाने हे सगळी   कामकाज सुरु आहेत. वारंवार सुरक्षा रक्षकांच्या बदली साठी व्यापाऱ्यांनी मागणी केली तरी हि मार्केटचे संचालक ,सभापती आणि उप   सचिव   या कडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे या सगळ्या प्रकरणाला यांचा   पाठींबा आहे कि काय अशी शंका   व्यापारांकडून व्यक्त केली जात आहे.