पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी – रविकांत तुपकर

5
0
Share:

बुलडाणा :राज्यभर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणी करीता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत असतांना पोलीस प्रशासनाकडून रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी थेट 50 हजार रुपये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पिकविमा मंजुर करण्यात यावा. या मागण्याकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर “राडा आंदोलन” करण्यात आले.

राज्यभर शेतकरी अडचणीत असताना सत्ताधारी पक्ष सरकार स्थापनेत व्यस्त आहेत. त्यामुळे नंतर सरकार स्थापन करा. आधी शेतकरी संकटातुन वाचवा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाकडून रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share: