देशातील कापूस दरात सुधारणा कापूस दर २ टक्क्यांनी वाढले.
देशातील कापूस उत्पादकांना दिलासा कापसाचे ७ ते ८ हजार रुपये दर  
दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नरमल्यानं भारताच्या कापसाला मागणी नव्हती , निर्यात कमी होते असे सांगितले जात होते . मात्र कालपासून कापूस दरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळपर्यंत कापूस दर २ टक्क्यांनी वाढले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीच्या दरात चांगली सुधारणा झाली. कापूस वायद्यांमध्ये जवळपास ५ सेंटची सुधारणा होऊन, दरानं ८२.४७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देणाऱ्या घडामोडी सध्या बाजारात घडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापसाचे दर   सुधारले आहेत. कापूस वायदे तसेच हजर बाजारात कापसाच्या दर आज वाढले आहेत.
कापसाचे सरासरी भाव ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांदरम्यान पोहचले आहेत . पुढील काळात कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीच्या दरात चांगली सुधारणा झाली. कापूस वायद्यांमध्ये जवळपास ५ सेंटची सुधारणा होऊन, दरानं ८२.४७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. कापसाचा भाव जवळपास १५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोचला.
देशातील कापूस वायद्यांमध्येही २२० रुपयांची सुधारणा होऊन दर ६१ हजार ४४० रुपये प्रतिखंडीवर पोचला. एका खंडीत ३५६ किलो रुई असते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर १७ हजार २५३ रुपये भाव आहेत. देशातील वायद्यांमधील दर जवळपास २ हजार रुपयांनी अधिक आहेत.
एप्रिलमध्ये काय स्थिती राहील?
एप्रिलमध्येही काही दिवस कापसाची आवक जास्त राहू शकते. मात्र त्यानंतर आवक मर्यादीत होऊन दरात सुधारणा होऊ लागेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय.
बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर पूर्वपातळीवर आल्यानंतर देशातील सरासरी दरपातळीही वाढू शकतात. पण त्यासाठी शक्य असल्यास शेतकऱ्यांना थांबावे लागेल. 
बाजारातील कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्यक्ष बाजाराचा आढावा घेऊनचं कापसाची विक्री करावी. कारण जसे शेतकऱ्यांना वाटते जास्त दर मिळावा, तसेच कापूस घेणाऱ्यांनाही वाटत असते की स्वस्तात कापूस मिळावा. बाजारात फंडामेंटल्स बदलले की परिस्थितीही बदलते हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.