शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा
राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे... राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत... हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकटामुळं शेतकऱ्यांनी आपली पिके सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे... मध्य भारतामधील काही भागात मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पूर्व विदर्भातील काही भागामध्ये आज पासून पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.. विशेष म्हणजे लाखांदूर, साकोली, तुमसर व लाखनी ह्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ह्याच तालुक्यात पावसाची शक्यता जास्त आहे.. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावण्याचे चिन्ह दिसू लागले आहे...