९५ किलो वांग्याची विक्री, पदरात फक्त ६६ रुपये
९५ किलो वांग्याची विक्री, पदरात फक्त ६६ रुपये
वांग्याचे उत्पादन करणारा शेतकरी आता संकटात सापडला आहे. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. एका शेतकऱ्याला ९५ किलो वांग्याचे फक्त ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना अशातच आता वांग्याचे उत्पादन करणारे शेतकरीही संकटात सापडले आहेत. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्याला ९५ किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाना तिवटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये वांग्याची विक्री करण्यात आली होती. यानंतर उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या ११ गुंठे शेतातील वांग्याचं पीकच उपटून टाकलं आहे.
पिकाला हवीभाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी: 
सध्या वांग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वांग्याला दर नसल्यामुळे पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतातील कांद्याचं पीक उपटून टाकलं आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तीन महिने कष्ट करुन पिकविलेल्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पिकाच्या काढणीचा खर्च देखील मिळालेल्या दरातून निघत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल? याकडे लक्ष द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.