मुंबई APMC मार्केटमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यवर्ती इमारत येथे तीथी नुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बांधकाम समितीचे सभापती माधवराव जाधव, बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, शिवसेना संघटनेचे सचिव नारायण महाजन, उपाध्यक्ष मारोती लष्करे विविध संघटनांचे पदाधिकारी, मुंबई एपीएमसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ, प्रकाश जाधव, प्रकाश जावळे, दिपक हराळ, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.