Mumbai Apmc Onion Price I मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा भावात आली तेजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो APMC न्यूज डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे.. आज आपण जाणून घेणार आहोत आज चे कांदा बाजार भाव आणि सोबतच असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती.
राज्यामध्ये कांद्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात घसरलेले गेल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबई apmc मध्ये   कांद्याच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे .
मुंबई apmc   कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १६२ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया   कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी १०९ गाड्या आल्या असून कांदा   १४ ते १५   रुपये दराने विक्री होत आहे ..   बटाट्याच्या प्रत्येकी ३९ गाड्या आल्या असून बटाटा ९ ते १०   रुपये किलोने विक्री होत आहे .. तसेच लसूण च्या १४   गाड्या आल्या असून लसूण ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.