अवकाळी पावसाचा कोकणाला दणका आंबा, काजू पीक आले धोक्यात…
नवी मुंबई: गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणलाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली आहे.कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार धूमाकूळ घातल्याने काजू आणि आंबा पिकावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे आता आंबा आणि काजू उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे.
गहू, मका, ज्वारी, कांदा, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे झाले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार अवकाळी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
तर दुसरीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी उभा पिकावर नांगर फिरवला आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
एकीकडे शेतकरी नैसर्गिक संकटमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण या चिंतेत आहे.
आता विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह आता कोकणाला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.कोकणात अवकाळी झाल्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सर्वच भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची अचानक तारांबळ उडाली.
हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे जाहीर केले होते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
या पावसामुळे संपूर्ण दापोली तालुक्यातील आंबा, काजू पीक धोक्यात आले आहे.आता आलेल्या पावसामुळे आलेलं पीक कसे टिकवायचं हा सवाल आता शेतकऱ्यांना सतावत आहे.