Narendra patil on Sandeep Deshpande Attack : "नेत्यांना धमक्या, हल्ले, राजकीय पाठबळाशिवाय होत नाही" नरेंद्र पाटीलांचे CM,DCM वर आरोप
जेल मधून पे रोल मध्ये येउन माथाडी कामगारांच्या युनिअन काढतात
इंडस्ट्री मध्ये जाऊन कामगारांच्या नावाने अक्षरशः पैसे खाण्याचं काम करतात
CM आणि DCM याना माहिती असून सुद्धा कारवाई होत नाही
गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि खऱ्या कामगाराला न्याय द्यावा
खऱ्या माथाडी कामगारांना तुरुंगात टाकतात आणि खोट्या कामगार नेत्याच्या शेजारी फिरतात
खंडणी मागणाऱ्या बोगस माथाडी कामगार नेत्या बाऊन्सर घेउन फिरतात
Mathadi Neta Narendra Patil   has criticized Eknath Shinde :नवी मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे [Sandeep Deshpande] यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची मोठी माहिती समोर अली आहे,   पोलिसांनी या प्रकरणी भांडुप परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं. यापैकी एकाची ओळख पटली असून त्याच   नाव अशोक खरात आहे. तो शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माथाडी संघटनेचा उपाध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा भांडुप परिसरातील कोकण नगरात राहतो. त्याच्याबरोबर सोळंखी नावाचा आणखी एक सहकारी होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.यावर आणासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले कि माथाडी चळवळ मध्ये जे   गुंड प्रवृत्त्तीची लोक जेल मधून पेरोल वरून येतात अश्या   लोकांनी माथाडी कामगारांच्या युनिअन काढले   आहेत .   काहि युनियन्स इंडस्ट्रीज मध्ये जाऊन कामगारांच्या नावाने अक्षरशः पैसे खाण्याचं काम करतात हि सर्व गोष्टी   मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याना माहिती असून कोणत्याच प्रकारची   कारवाई देखील होत नाही .. आता जी माणसे भेटलली आहेत त्यांचे जे नेते आहेत ते   कोणाच्या बाजूनी आहेत ? कोणत्या पक्षाला सपोर्ट करतात ? तसेच जे कामगारांचे नेते आहेत ते कोणत्या कामगाराच्या नावानी पैसे खातो ?? कोण नेता गुंड प्रवृत्तीचा आहे ? हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना   माहित असत पण मेरी भी चूप 'तेरी भी चूप .. यांच्या विरोधात सामान्य माणूस कसं बोलणार ? या मध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि खऱ्या कामगाराला न्याय द्यावा नाही तर खऱ्या माथाडी कामगारांना तुरुंगात टाकतात आणि खोट्या कामगारांच्या नेत्याच्या शेजारी बसून पत्रकार परिषद घेतात , त्यांच्या मेळाव्याला जातात , सत्काराला जातात .. वाढदिवसाला जातात ... अशे प्रकार राज्यात सुरु असतील तर मनसे नेते   संदीप देशपांडे यांच्या   सारख्या अजून कोणावर मोठा हल्ला होऊ शकतो यावर त्वरित मख्यमंत्री आणि गृहमंत्री लक्ष्य दियाला गरजेचे आहे.   अशी प्रतिक्रिया   माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.