मुंबई APMC सभापती व उप सभापती पदावर शिंदे फडणवीस सरकार घेणार ताबा!
मुंबई APMC सभापती व उप सभापती पदावर शिंदे फडणवीस सरकार घेणार ताबा!
- राष्ट्रवादी व कांग्रेसच्या बालेकिल्यात शिंदे फडणवीस सरकारची एंट्री, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार.
- अडीच वर्षांपूर्वी पराभूत झालेला भाजप आता घेणार बदला.
- पनवेल APMC मधील शेकापच्या   बालेकिल्यात भाजपची   एंट्री ,शेतकरी कामगार पक्ष्यचे टेन्शन वाढणार.
नवी मुंबई : राज्यात २९० बाजार समितीसह मुंबई APMC सभापती आणि उप सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीचा डोळा समोर ठेउन ,शिंदे फडणवीस सरकारने आता पासूनच मोर्चे बांधणी सुरु केलेली आहे , राष्ट्रवादी कांग्रेस ,कांग्रेस आणि ठाकरे शिवसेना बाले किल्यात आपल्या उमेदवारीसाठी आता पासून कामाला   लागली आहे .राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या   बाजार समिती काबीज करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने योजन आखली आहे ,नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचे टेन्शन वाढवले आहे ,या आगामी काळात राष्ट्रवादी साठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे ,राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष्याच्या   बालेकिल्यात शिंदे फडणवीस सरकाने पायाभऱ्यात कशी   सुरुवात केली आहे आणि भविष्यात महाविकास आघाडी समोर कसे आवाहन निर्माण केले जातेय ते पह या रिपोर्ट मधे.
शेतकरी कामगार पक्ष्याची एकहाती सत्ता असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे वादग्रस्त ओट्यामुळे प्रशासकाच्या हाती गेल्यामुळे भाजपचे   आमदार प्रशांत ठाकूर व कार्यकर्त्यांनी जल्लोष   साजरा केला आहे,   येणाऱ्या निवडणुकीत   पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती काबीज करण्यासाठी   भाजपने मास्टर प्लान   तयार केला आहे.. त्यामुळे   पनवेल महापालिका बरोबरच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपली सत्ता काबीज करण्यासाठी   पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी   मिशन पनवेल apmc हातात घेतले आहे . शेतकऱ्याच्या जागेवर बेकायदेशीर पद्धतीने ओटे बांधून शेतकऱ्यांना हद्द पार करणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे   संचालक मंडळाचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे . हिवाळी अधिवेशनात आमदारांनां दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करीत बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची   नेमणूक करण्यात आली   आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकार   बाजार समितीमध्ये   झालेल्या भ्रष्टाचारच्या   मुद्दा घेयून शेतकऱ्याच्या समोर जाणार आहे.  
राज्यातील सहा महसूल विभागांतून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येऊन अडीच वर्ष झाले . एक व्यापारी प्रतिनिधी व एक कामगार प्रतिनिधीची बिनविरोध आले होते . ४५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बाजार समितीवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रभुत्व आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे मार्केटवर   वर्चस्व राहिले आहे. बाजार समिती मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये   महाविकास आघाडी एकत्र शेतकरी प्रतिनिधी निवडण्यासाठी पॅनल तयार करण्यात आले होते . काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी पाच ठिकाणी व शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष प्रत्येकी एक जागेवर निवडणूक लढले होते . मुंबई   (APMC) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता, सहा महसूल आणि चार व्यापारी मतदारसंघात भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं होतं.राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला होता . भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. आता भाजप आपल्या पराभवच्या बदला घेण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. भाजप अडीच वर्षांपूर्वी जे खाते उघडले नव्हते आता शिंदे सेना   सोबत राहून बाजार समिती तव्यात घेणार आणि महाविकास आघाडीला   हद्दपार करण्याची तयारी सुरु केले आहे . बाजार समिती मध्ये ४५ वर्षांपासून राज्य करत असणाऱ्या   राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष्या कडून   शिंदे फडणवीस सरकार तव्यात घेणार का   याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे .