Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात, राजकारणात वेगवान घडामोडी!
Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात, राजकारणात वेगवान घडामोडी!
नई दिल्ली: सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु असतानाच राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यापैकीच एक माहिती समोर आली आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयावरही एकनाथ शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.