अधिक आणि वेगाने चाला, हृद्यरोग टाळा!
वेगाने चालल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो असा दावा अमेरिका येथील ब्राउन युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार आपले मत मांडले आहे. दोन दशकांपर्यंत महिलांवर केल्या गेलेल्या संशोधनानुसार ही गोष्ट समोर आली आहे की वाढत्या वयामध्ये हृदयावर वाढणारी धोके लक्षात घेता आपण नियमितपणे जर चालत असू यामुळे आपल्याला भविष्यात हृदयविकाराचे धोके उद्भवत नाही तसेच नेहमी चालण्याच्या सवयींमुळे आपण हृदयविकाराचा धोका टाळू सुद्धा शकतो.
ब्राउन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी २५ हजारांपेक्षा अधिक महिलांवर दोन दशकापर्यंत संशोधन केले. संशोधन केल्यानंतर संशोधनात एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली की यादरम्यान १ हजार 455 महिलांचे हार्ट फेल झाले. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटी जर्नल मध्ये पब्लिश झालेली रिपोर्ट असे सांगते की , संशोधनात सहभागी झालेल्या महिलांनी किती चालले आहे. यावर आणि प्रश्न उत्तरे विचारले गेलीत त्यांच्या उत्तरांच्या आधारावरच हा रिपोर्ट तयार केला गेला. दोन दशकांत पर्यंत त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यात आले. या अभ्यासाअंतर्गत असे समोर आले की, ज्या महिला नियमितपणे वेगाने चालत होत्या त्यांच्या बाबतीत हार्ट फेल म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी झाला असे दिसून आले.
संशोधक डॉ. चॉर्ल्स एटॉन यांच्या मते १ हजार ४५५ महिलांमध्ये हार्ट अटॅक ची स्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाढते वय व त्याचबरोबर वाढत्या वयामुळे त्यांच्या हृदयाची रक्तभिसरण करण्याची जी क्षमता होती ती हळूहळू कमी झाली होती आणि म्हणूनच त्याच्या शरीरातील हृदय जास्त प्रमाणात रक्ताचे पंपिंग करत नव्हते. नियमित चालण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांच्या या समस्येवर सकारात्मक परिणाम दिसू लागला म्हणूनच वाढत्या वयामध्ये अशा प्रकारचे धोक्यापासून जर आपल्याला आपले हृदय सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल करणे अनिवार्य आहे.
संशोधनानुसार धीम्या गतीने चालल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या काही मांसपेशी असतात त्यांची गती हळूहळू कमी होते आणि म्हणूनच अध्ययनात असे स्पष्ट झाले की, हळू चालणाऱ्या लोकांपेक्षा वेगाने चालणाऱ्या लोकांचे आरोग्य नेहमी चांगले राहिलेले आहे तसेच या व्यक्तींना आरोग्य संदर्भातील कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागत नाही,हे सुद्धा स्पष्ट झाले. संशोधक चार्ज यांच्या मते वयोगट 50 ते 79 वयातील महिलांना हार्ट फेल होण्याची समस्या ही वाढत्या वयामुळे उद्भवत असते.