मुंबई APMC अभियंत्यांचा भोंगळ कारभार फळ मार्केट्मधे स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
निकृष्ट दर्जाचे काम केल्याने   दोन वर्षाआधीच कोसळले
कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्याच्या थुक्पट्टी कारभारामुळे मार्केटमधे स्लॅब कोसळला
अशे अभियंत्यावर कारवाई करुन हकालपट्टी करा,बाजार घटकाची मागणी
मुंबई APMC फळमार्केट मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे .. मुंबई apmc फळमार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी   सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये   एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात स्लॅब कोसळून गंभीर दुखापत झाली आहे.. रुग्णास त्वरित वाशी महानगरपालिका रुग्णालयात नेले असता त्याच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी   मुंबई येथील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रुग्णास अजूनही शुद्ध आली नसून त्यावर उपचार सुरु आहेत   अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी यांनी Apmc Newsला दिली आहे   ..सायंकाळी ८ च्या सुमारास व्यापारी व कामगारांची फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली मात्र हाच प्रकार सकाळी घडला असता तर अनेकांच्या जीवास धोका निर्माण झाला असता आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेमुळे बाजारघटकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे .फळ मार्केटमध्ये दोन महिन्यापूर्वी मोठी आग लागली होती यामध्ये ३५ दुकाने जाळून खाक झालं होता..आता स्लॅब कोसळ्याने गंभीर दुखापद झाली आहे ..मात्र सचिव राजेश भुसारी कारवाई एन करता जाणून बुझुन दुर्लक्ष्य करत आहे ..फळ मार्केटमध्ये चालले काय अशी चर्चा बाजार आवारात होत आहे .
F विंग मधील 121 आणि 168 या ठिकाणी शेतमाल येणाऱ्या धक्याच्या पॅसेजवर हा स्लॅब कोसळला .. बाजारसमितीतर्फे   दीड ते दोन वर्षांपूर्वी डागडुजीचे काम करण्यात आले होते, मात्र अवघ्या दोन वर्षातच येथील स्लॅब ची स्थिती अत्यंत   दयनीय झाली   असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम दोन वर्षा आधीच कोसळले आहे .. .स्लॅबच्या शिगा या पूर्णपणे गांजलेल्या आहे.. यातून असा अंदाज व्यक्त केला जात आहे कि स्लॅब बांधकामाच्या नावाखाली पोकळ बांधकाम करून कंत्राटदार आणि अभियंताच्या अर्थपूर्ण कारभार केला गेला आहे.
आम्ही बाजारसमितीला   सेस भरतो मात्र आम्हाला सुविधाच्या नावाने थुक्पट्टी काम करुन संचालक आणि अभियंत्याने आम्हाला फसवणुक करत आहे ,असा गंभीर आरोप बाजारघटक करीत आहे ..   नेमकी ही दुर्घटना कोणत्या कारणानं घडली? बाजारसमिती इतकी बेजबाबदार का ? या भोंगळ कारभाराळ कोणाचा पाठिंबा तर नाही ना ? असा सवाल बाजारघटकांमध्ये उपस्थित होत आहे .. सदर दुर्घटनेची   माहिती फळ मार्केट्चे व्यापारी बाळकॄष्ण शिंदे यांनी दिली आहे.