मुंबई APMC चे उप सचिव ईश्वर मसराम यांच्या निधनामुळे बाजारघटकांमध्ये दुःखाचे सावट
नवी मुंबई: मुंबई apmc मसाला मार्केट चे उपसचिव ईश्वर मसराम यांचे बुधवार दिनांक १ मार्च २०२३ रोजी रात्री 11:30 वाजता   ह्रदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले आहे... वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास .. मुंबई apmc मध्ये   सुरुवातीला लेखा शाखा   ,मार्केट २, दक्षता विभाग ,मार्केट १, फळ ,कांदा   बटाटा मार्केट ,आता मसाला मार्केटमध्ये कार्यरत होते एकूण ३३ वर्ष त्यांनी सेवा केली .. ३०जून   २०२३ ला सेवानिवृत्त होणार होते अर्थात ३ महिन्यात त्यांची सेवानिवृत्ती होती..   ईश्वर मसराम यांच्या पाश्चत्य त्यांची पत्नी,२ मुली आणि एक मुलगा आहे ..   ईश्वर मसराम शांत व मनमेळाऊ   स्वभावा चे होते.. , व्यापारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राहणारे असे होते.. आज त्यांच्या जाण्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार घटकांमध्ये   दुःखाचे सावट पसरले आहे..