केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! सूक्ष्म सिंचनासाठी 70 हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! सूक्ष्म सिंचनासाठी 70 हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या राज्यातील राज्य शासनाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सूक्ष्म सिंचन योजना ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेचीं विशेष बाब अशी की ही योजना केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर देखील कार्यान्वित आहे. यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुहेरी फायदा या ठिकाणी मिळत आहे. दरम्यान आता राज्यातील 70 हजार शेतकऱ्यांना लवकरच सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 100 कोटी रुपयांच अनुदान केंद्राच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
या आर्थिक वर्षातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर राज्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत चालू वर्षासाठी 648 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यामध्ये 179 कोटी रुपये इतका मागील वर्षाचा शिल्लक निधी होता. तसेच आत्तापर्यंत चालू वर्षासाठी 296 कोटी प्राप्त झाले आहेत. म्हणजेच राज्याकडे 465 कोटी रुपये आतापर्यंत या योजनेअंतर्गत प्राप्त झाले आहेत. यापैकी 419 कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अनुदान देखील या ठिकाणी वितरित झाले आहे.
दोन लाख 49 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदान या आर्थिक वर्षात देण्यात आले आहे. दरम्यान आता 100 कोटी रुपये नजीकच्या काळात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यातून राज्यातील 70 हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होणार आहे. निश्चितच सूक्ष्म सिंचनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ या ठिकाणी मिळत आहे.