मुंबई APMC मार्केट मध्ये ड्रायफ्रूटस , मोदक, घरगुती सजावटींची लगबग!
मुंबई APMC मार्केट मध्ये ड्रायफ्रूटस , मोदक, घरगुती सजावटींची लगबग !
खरेदीची रेलचेल सुरु असतानाच मार्केट मध्ये सामानाची मागणी वाढली.
महाराष्ट्रभरात   माघी महिन्यातल्या माघी गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी व सार्वजनिक मंडळात भक्तजन बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी करीत आहे . सर्वत्र पूजेचे सामान, सिंहासन, नैवेद्यासाठीचे पदार्थ ,ड्रायफ्रुटस ,मोदक तसेच ताज्या   फळांच्या व फुलांच्या सजावटीच्या खरेदीसाठी मुंबई apmc   मार्केट मध्ये नागरिकांची लगबग दिसून येत आहे.. खरेदीची रेलचेल सुरु असतानाच गणपती उत्सवमुळे मार्केट मध्ये सामानाची मागणी वाढली आहे....गणेश आगमांसाठी प्राणप्रतिष्ठा करण्यात येते त्यासाठी वस्त्रमाळ,हार फुले,सजावट सामानाची मागणी वाढल्यामुळे APMC मार्केट मध्ये गर्दी दिसून येत आहे.. बाजार आवारात सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरले आहे.