किसान सन्मान निधीच्या ११ व्या हप्ता मिळण्यासाठी नोंदणी बंधनकारक
केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. १ जानेवारी रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १० व्या हप्त्याचे २ हजार रुपये पाठवले आहेत. सरकार लवकरच ११व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
अशी करा नोंदणी (रजिस्ट्रेशन)
1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2. तेथे होमपेजवर तुम्हाला Farmers Corner असा पर्याय दिसेल.
3. येथे तुम्हाला 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
5. यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
6. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
7. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.