BIG BREAKING | सर्वात मोठी बातमी, गोळीबारातील पिस्तूल सदा सरवणकर यांचीच, पण...
मुंबई: मुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झालेला. या राड्यात गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलेला. आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येतेय. आता या गोळीबार प्रकरणाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय. पण पोलीस तपासातून सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे गोळीबार झाला ही घटना खरी असल्याचं तपासातून स्पष्ट करण्यात आलंय.
दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं समोर आलेलं. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण आतापर्यंत पोलीस तपासातून एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून हा निष्कर्ष निघालेला आहे.