अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका
आर्थिक नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे   शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.या पवासामुळं द्राक्षांचे घड खाली पडले आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षाच्या मण्याला तडे गेले आहेत.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, करकंबसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे. द्राक्षांचे घड खाली पडत आहेत. तसेच मण्यांना तडेही जात आहेत. यामुळं व्यापारी माल घेण्यास नकार देऊ लागल्यानं बळीराजा अडचणीत आला आहे.पंढरपूर तालुक्यात कासेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाच्या बागा आहेत. मात्र, गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना या बागा कशा वाचवायच्या असा प्रश्न पडला आहे.पावसाच्या पाण्यामुळं द्राक्ष खराब होऊ लागल्यानं मोठे आर्थिक नुकसान होत असल्यानं द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तत्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.