Big Breaking ! अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाचेची ऑफर, डिझायनर विरोधात गुन्हा दाखल काय आहे प्रकरण?
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून अखेर या डिझायनर महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मलबार हिल पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.