करोडोच्या गुटक्यासह ५ आरोपींना तुर्भे पोलिसांनी केली अटक
करोडोच्या गुटक्यासह ५ आरोपींना तुर्भे पोलिसांनी केली अटक
- तुर्भे पोलिसांनी जप्त केला ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा दोन टेम्पो ताब्यात
- वितरक, माल वाहतूक करणारा आणि विकत घेणाऱ्याचा समावेश
- गुजरात येथून मागवून ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरण
- आणखी मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती
गुजरातहून नवी मुंबईमध्ये गुटखा आणून विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत एकूण ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.. नवी मुंबईतील म्हापे चेक पोस्ट येथे तुर्भे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला मिळून आला होता..११ लाख ९६ हजार ८०० रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला गुटख्याच्या ३० मोठ्या गोण्या व ६ लाखांचा टेम्पो असा एकूण १७ लाख ९ हजार, ८०० रुपयांचा ऐवज   जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केला असता गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी हे गुजरात येथून कंटेनरद्वारे मागवून त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरण करतात, अशी माहिती समोर आली. त्याच तपासणी दरम्यान अजून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती अटक आरोपींकडून मिळाली आहे ... या आधी देखील नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या तुर्भे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका संशयित टेम्पो मधून तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त केला होता.. आतापर्यंत पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे,ते ही मोहीम अजून संपली नसून अजून काही धागेदोरे लागण्याची शक्यता आहे .. त्यामुळे हा गुजरात मधून येणारा गुटखा नक्की कोण मागवतो आणि कुठे जातो ? याचा तपास सुरू असून,पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले,त्यामुळे मोठ्या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.