शेतकरी संघटनांचा एक दिवस लिलाव बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान
शेतकरी संघटनांचा एक दिवस लिलाव बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान
- शासन पातळीवर दखल, लिलाव सुरू आता पुढे काय होणार ?
- लासलगाव बाजार समितीत झाले एक दिवसीय आंदोलन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मार्ग सोडविला जाईल दादा भुसे
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी 27 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. शेतकरी आक्रमक होऊन यामध्ये विविध संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीतही कांद्याचे लिलाव बंद होते. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारला लिलाव बंद ठेवले तर मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः अर्थसंकल्पीयन अधिवेशन संपताच नाशिककडे धाव घेऊन लासलगाव बाजार समितीत जाऊन शेतकाऱ्यांशी आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधीची चर्चा केली जाईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी भूमिका दादा भुसे यांनी घेतली. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याच दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मार्ग सोडविला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे .