मोसंबी झाडावर रोगाचे थैमान सुरू
मोसंबी झाडावर रोगाचे थैमान सुरू
- मोसंबीवर मंगू रोगाच्या प्रकोपामुळे बळीराजा अडचणीत.
- शेतकऱ्यांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.
जालन्याची मोसंबीमुळे मोठी ओळख आहे. मोसंबी बाजरपेठेमध्ये यंदा १०० ते १५०   टन मोसंबीची आवक होत आहे.. मात्र, यंदा मोसंबी झाडावर वाढलेल्या मंगू रोगाचा प्रकोपामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. मंगूच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.मृग बहार मोसंबी वर मोठ्या प्रमाणावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. झाडावर असलेल्या बुरशीमुळे या रोगाचा प्रकोप वाढताना दिसून येत आहे . एकदा प्रादुर्भाव झाला की फवारणीचा विशेष परिणाम पाहायला मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. मोसंबी दरावर देखील परिणाम होत आहे. मंगू रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या मोसंबीला प्रतिटन 15 ते 20 हजार एव्हढा दर मिळत आहे. तर मंगू रोगाचा प्रादुर्भाव असलेली मोसंबी केवळ 10 ते 12 हजार रुपये प्रतिटन दर मिळत. यामुळे बाजारात मोसंबीला ग्राहक मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत.