शेतकऱ्यांकडून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
लाल वादळ विधानसभेवर धडकणार हे निश्चित
तीन वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तोडगा निघणार का?
किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई (Nashik) असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे.. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे पडलेले भाव हक्काच्या वन जमिनी, दिवसा वीज या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काल अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक
दरम्यान, काल (13 मार्च) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्याने लाँग मार्च सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत हा लाँग मार्च विधानसभेवर धडकणार हे निश्चित आहे.