Mumbai Apmc vegetable Price I मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये भाजांच्या दरात वाढ
नमस्कार शेतकरी मित्रांनो APMC न्यूज डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे.. आज आपण जाणून घेणार आहोत आज चे भाजीपाल्याचे   भाव आणि सोबतच असलेली भाज्यांची नेमकी आवक किती व भाजीपाल्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती.
राज्यात अवकाळी पाऊसामुळे भाजीपाल्याचे भाव दणाणले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 
गेल्या आठवड्यात मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये ३२ रुपये किलोने विक्री होणारी मिरची आज ४८ रुपये किलोने विक्री होत आहे.
मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६८७   गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ   जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६८७ गाड्याची आवक झाली असून   मेथी   १८ रूपये ,कांदापात १६ ,शेपू १६   रुपये , भोपळा ३३ रुपये, शिमला ३० रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव २९ रुपये प्रतिकिलो, भेंडी ३०   ,गवार ६५   रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ७ रुपये किलो आहे , फ्लॉवर ११   रुपये, टोमॅटो १६ रुपये, मिरची मागील आठवड्यात   ३२ ते ३५   रुपये किलो ने विक्री होत असलेली आज ४५ ते ४८ रुपयाने विक्री होत आहे..   , कोथिंबीर चा दरात वाढ होऊन १६ रुपये दराने विक्री होत आहे.   तोंडली ४५ रुपये ,कारली ३५ रुपये   किलोने विक्री होत आहे.