रुग्ण मृत्यू संख्येत वाढ झाल्याने चिंता वाढली
कोरोना विषाणू संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात अडीच लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील आठ हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात दिड लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३८५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ हजार २०९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात ८ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद रविवारी झाल्याचे समोर आले आहे.
देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली असून राज्यात काल ८ ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात देखील चाळीस हजारपार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४० हजाराहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.