अवकाळी पावसाचाच्या दोन दिवस विश्रांती नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचा फटका बसणार
विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात पावसचा अंदाज
विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता
कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता
आज पासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि   मराठवाड्यात १३ ते १६ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 
या आधीही मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. अशातच पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. १६   मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. यातच प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.