सध्या टाईप-2 मधुमेही रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; वाचा काय आहेत लक्षणे
अलीकडेच वेगवेगळ्या आजारांमुळे लोक आरोग्याविषयी अधिक सतर्क असल्याचं दिसून येतं. सध्या टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय (Symptoms) वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकदा मधुमेह झाला की तो कधीच संपत नाही. हा आजार टाळण्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेणे आवश्यक आहे. धावत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारात शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. डॉक्टरांच्या मते मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार-1 आणि दुसरा प्रकार-2. आता टाईप 2 मधुमेहाची प्रकरणे अधिक दिसून येत असल्याची तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत. इंटरनॅशनल डायबिटीज फाउंडेशनच्या मते, जगभरात 537 दशलक्ष प्रौढ आहेत. लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या मुलांमध्येही या प्रकारचा मधुमेह दिसून येतो. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे टाईप-2 मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
तज्ज्ञ काय सांगतात!
फिजिशियन डॉ. कमलजीत सिंग सांगतात की टाईप-2 मधुमेहाची प्रकरणं आता अधिक दिसून येत आहेत. हा आजार फारसा जीवघेणा नसला तरी त्याची लक्षणं दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉ. सिंग यांच्या मते, ज्या लोकांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि भरपूर मद्यपान किंवा धूम्रपानाची सवय आहे. त्यांना हा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराचे कारण म्हणजे शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते.
अवेळी जेवण घातक
टाईप-2 मधुमेह काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही होतो. एकदा मधुमेह झाला की तो कधीच संपत नाही. तुम्ही फक्त त्यावर नियंत्रण ठेवू शकता. हा आजार टाळण्यासाठी चांगली जीवनशैली जगणे आवश्यक आहे. आहाराची काळजी घ्या, रोज किमान अर्धा तास व्यायाम करा. जीवनात अनावश्यक मानसिक ताण घेऊ नका. मधुमेह कोणत्याही कारणाने झाला असेल, तर नियमितपणे रक्तातील साखर तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहाराकडे लक्ष द्या.
मधुमेहाचे प्रकार किती?
टाईप-1 आणि टाईप-2 मधुमेहामध्ये बराच फरक असल्याचं डॉक्टर सांगतात. टाईप-1 मधुमेह आनुवंशिक कारणांमुळे होऊ शकतो. यामध्ये तरुण वयातही व्यक्ती मधुमेहाची शिकार होऊ शकते. तर टाइप-2 मधुमेह होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली. त्यामुळे जवणाच्या वेळा, व्यायाम या गोष्टी वेळेवर करायला हव्यात.
टाईप-2 मधुमेहाची लक्षणं
भूक लागते
अंधुक दृष्टी
वारंवार मूत्रविसर्जन
दुखापती लवकर बरी न होणं
खाजगी भागावर खाज सुटणे
खूप तहान लागणे