मुंबई Apmc सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
स्लॅब कोसळून   कामगाराच्या डोक्यात गंभीर दुखापत
निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने स्लॅब   कोसळले
कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्याच्या थुक्पट्टी कामामुळे वारंवार दुर्घटना
मुंबई apmc फळमार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी   सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती ..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये   एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात स्लॅब कोसळून गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने त्यावर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत ..   सदर घटना   सायंकाळच्या सुमारास घडल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. बाजारसमितीतर्फे   दीड ते दोन वर्षांपूर्वी डागडुजीचे काम करण्यात आले होते, मात्र अवघ्या दोन वर्षातच येथील स्लॅब ची स्थिती अत्यंत दयनीय झाली   असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम दोन वर्षा आधीच कोसळले आहे.. F विंग मधील 121 आणि 168 या ठिकाणी शेतमाल येणाऱ्या धक्याच्या पॅसेजवर स्लॅब कोसळला होता   .स्लॅबच्या शिगा या पूर्णपणे गंजलेल्या आहे.. यातून असा अंदाज व्यक्त केला जात आहे कि   बांधकामाच्या नावाखाली पोकळ बांधकाम करून कंत्राटदार आणि अभियंताच्या अर्थपूर्ण कारभार केला जात आहे. त्यामुळे बाजारसमितीमध्ये अश्या   दुर्घटना वारंवार घडत आहेत .. मुंबई apmc सचिव राजेश भुसारी यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता जाणून बुझुन दुर्लक्ष्य करत आहे   .   त्यामुळे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी   बाजारघटक   करीत आहे   ..