मुंबई Apmc मध्ये ६० हजार आंबा पेटींची आवक
- पाडव्याच्या मुहूर्तावर आवक वाढली डझनाला हापूस ४०० ते १२०० रुपये
- विविध राज्यांतून १२ हजार पेट्या मुंबई Apmc मध्ये विक्रीसाठी रवाना
- यंदा आंब्याचे दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.
- फळमार्केट्मधे   रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ४८ हजार पेट्यांचा समावेश
- गतवर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक वाढली मात्र दर कमीच  
गेल्या आठ दिवसांमध्ये मुंबई Apmc मार्केटमध्ये   ४० ते ६० हजारांच्या आंबा   पेटींची आवक झाल्याचे दिसून आले आहे. गुढीपाडव्याला आंब्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून दरही दीड हजार ते ४ हजार रुपये पाच डझनच्या पेटीला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक असला तरीही दर दोन हजार रुपयांनी कमी आहेत.गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर मुंबई apmc येथील बाजार समितीत विविध प्रकारच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा गुडीपाढव्याला अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत. सुमारे ६० हजार ८६८ आंबा पेट्या मार्केटमध्ये आल्या आहेत . यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ४८ हजार पेट्यांचा समावेश आहे.
त्यात देवगडीमधील सर्वाधिक ६० टक्के, रत्नागिरीतील २० टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित २० टक्के आंबा त्याचप्रमाणे   कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधून apmc मध्ये   सुमारे १२ हजार पेट्या   विक्रीसाठी आल्याची माहिती बाजारघटकांनी दिली आहे ..
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बऱ्यापैकी पेट्या कोकणातून विक्रीसाठी रवाना केल्या जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे .