मुंबई APMC फळ मार्केटचा कामगार रुग्णालयात बाजार समितीचा आरोग्य विभाग कोमात !
मार्केट संचालकाच्या अजब गजब कारभार
स्लॅब कोसळून   कामगाराच्या डोक्यात गंभीर दुखापत
फळ मार्केट संचालक मदत ऐवजी देतात फक्त आश्वासन  
कामगारांकडून रात्र दिवस काम करवतात ,काही झाले तर पाठ फिरवतात
निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने स्लॅब   कोसळले
कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंत्याच्या थुक्पट्टी कामामुळे वारंवार दुर्घटना
मुंबई APMC फळ मार्केट्मधे बुधवारी १५ मार्च रोजी   सायंकाळच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती ..या दुर्घटनेमुळे फळ मार्केटमध्ये   एकच खळबळ माजली होती.. या दुर्घटनेत एका कामगाराच्या डोक्यात स्लॅब कोसळून गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने त्यावर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरु होता ,नंतर त्याला   सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले   आहे त्याची प्रकृती अद्यापही   अत्यंत गंभीर आहे   .. सदर दुर्घटनेस ५ दिवस उलटूनही कामगारास अजूनही शुद्ध आलेली नाही तो अजूनही कोमात असल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे..व्यपाऱ्यांच्या गाळ्यावर दिवस रात्र काम करणाऱ्या मजुराची व्यथा एका कामगारांनी ज्यावेळी मार्केट संचालक संजय पानसरे यांना सांगितली त्यावेळी   त्यांनी फक्त अश्वसन दिले ,आता पर्यंत कुठल्याही मदत   संचालक अथवा प्रशासनकडून मिळालेली नाही ,त्यामुळे   बाजार समितीचा आरोग्य   विभाग कोमात आहेत का? अशे प्रश्न उपस्थित होत आहे .नाईलाजाने मार्केटमधील वयापारी बाळकृष्ण शिंदे व कामगारांनी   रुग्णाच्या मदतीसाठी काही रोखरक्कम गोळा करून उपचारासाठी त्याच्या भावाकडे सोपवली आहे ..बाजारसमितीमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध असूनही आरोग्यविभागातर्फे कोणतीही सुविधा रुग्णास मिळालेली नाही.. रुग्णास मदत करू ,असे पोकळ आश्वासन संचालक करत होते , मात्र ५ दिवस होऊनही त्याच्या साहाय्यासाठी कोणीही गेलेले नाही.. त्यामुळे कामगाराच्या जीवावर चालणाऱ्या व्यापाऱ्यांना   मदत करण्याऐवजी   संचालक जाणून बुझून दुर्लक्ष करत असल्याने बाजारघटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ..संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडिताच्या भावाने सांगितले आहे ..  
   
बाजारसमितीतर्फे   दीड ते दोन वर्षांपूर्वी डागडुजीचे काम करण्यात आले होते, मात्र अवघ्या दोन वर्षातच येथील स्लॅब ची स्थिती अत्यंत दयनीय झाली   असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम दोन वर्षा आधीच कोसळले आहे.. F विंग मधील 121 आणि 168 या ठिकाणी शेतमाल येणाऱ्या धक्याच्या पॅसेजवर स्लॅब कोसळला होता   .स्लॅबच्या शिगा या पूर्णपणे गंजलेल्या आहे.. यातून असा अंदाज व्यक्त केला जात आहे कि   बांधकामाच्या नावाखाली पोकळ बांधकाम करून कंत्राटदार आणि अभियंताच्या अर्थपूर्ण कारभार केला जात आहे. त्यामुळे बाजारसमितीमध्ये अश्या   दुर्घटना वारंवार घडत आहेत .. मुंबई apmc सचिव राजेश भुसारी यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता जाणून बुझुन दुर्लक्ष्य करत आहे. त्यामुळे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बाजारघटक करीत आहे   ..